Episode Artwork
1.0x
0% played 00:00 00:00
Jan 25 2023 10 mins  

एके दिवश महाराज शान्तनु गंगा नदीच्या काठी विहार करत होते अणि त्यांनी पाहिले की एक किशोर वयाच्या मुलाने आपल्या धनुर्विद्येने गंगेचा प्रवाह रोखून धरला होता. महाराज शान्तनु हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्याला त्याचा परिचय विचारला. त्याच वेळी देवी गंगेने तेथे प्रकट होऊन

शान्तनु यांना त्या मुलाचा परिचय दिला. ती म्हणाली "महाराज! आज मी तुमचा पुत्र देवव्रत तुम्हाला सोपवते आहे. याने ब्रह्मर्षि वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचे अध्ययन केलं आहे आणि धनुर्विदयेची कला स्वतः भगवान परशुरामांकडून मिळवली आहे.

हा आपला पुत्र कुरुवंशाचा उत्तराधिकारी होण्यासाठी अगदी योग्य आहे.” असं म्हणून देवी गंगा पाण्यात विलीन झाली आणि महाराज शान्तनु यांनी आपल्या पुत्राला आपल्याबरोबर महालात आणलं. देवव्रत सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये निपुण होता आणि महाराज शान्तनुना आपल्या पुत्राविषयी खूप अभिमान होता.